पुणे-बंगळूरू महामार्गावर शिवशाही जळून खाक !
सातारा : खरा पंचनामा
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर भूईंज व बदेवाडी गावच्या हद्दीत स्वारगेटला निघालेल्या कोल्हापूर डेपोच्या (क्र. mh 06 BW 3523) कोल्हापूर स्वारगेट या शिवशाही गाडीला चालक केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. त्यामध्ये गाडी जळून खाक झाली.
या घटनेने हायवे प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. जर वेळेत अग्निशमन यंत्रणा पोहोचली असती, तर एसटी बसचे कोणतेही नुकसान झाले नसते. किसनवीर कारखान्याची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळे आग विझवण्यात यश आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यावेळी महामार्गावर गाड्यांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास भुईंज पोलिस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.