मंगळवेढ्यातील त्या महिलेच्या मृत्यूचं गुढ उकललं
मुलाच्या शोधात वेड लागलेल्या महिलेला हेरलं अन् संपवलं
मंगळवेढा : खरा पंचनामा
मंगळवेढ्यातील पाटकळमध्ये एका विवाहितेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घरासमोरील गवताच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत या मृतदेहामुळे घरातील विवाहित सुनेनेच आत्महत्या केल्याचे सर्वांना वाटले.
यानंतर या विवाहितेचे माहेरकडील कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले. आपल्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे केला. पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय येऊ लागला. त्यातच या विवाहित महिलेचा फोन हा जळालेल्या मृतदेहावरती जळालेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. या फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एका तरुणावर संशय आला. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली असता सुरुवातीला या प्रियकराने आपणच या विवाहितेची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले असता त्याने पुन्हा घटनेची खरी कबुली देत ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे असे सांगितल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले. त्यानंतर सर्व सत्य समोर आलं. मात्र तो जळालेला मृतदेह एका वेडसर महिलेचा असल्याचं त्याने कबुल केलं.
या प्रकरणातील आरोपी विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर वीस वर्षीय निशांत सावंत यांचे काही महिन्यापासून अफेअर सुरू होते. या दोघाचं नातं दीर भावजयी असं आहे. विशेष म्हणजे या विवाहितेला दोन वर्षाची गोड मुलगी देखील आहे. आपण दोघे कायमचे पळून जायचे असे या दोघांनी ठरवले आणि त्यातूनच ही भयानक खुनाची स्टोरी रचली गेली. यामध्ये किरण हिने आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा यासाठी गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचे दाखवायचे असे ठरले. मात्र यासाठी कोणाचातरी मृतदेह यात असणे आवश्यक असल्याने किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला.
आठ दिवसांच्या शोधानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचे निशांत याला दिसले. यानंतर त्याने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटकळ येथील सावंत वस्ती येथे घेऊन आला. यानंतर दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटनेदिवशी या गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी पेटवून दिली. यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला. रात्री अडीचच्या सुमाराला गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरण हिला घरातून बाहेर बोलवून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले. यानंतर गंजी पेटवून निशान निघून गेला. आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले. यात निशांत ही सामील होता. या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असे कुटुंबाला वाटले. मात्र पोलिसांनी सखोल तपास केला त्यानंतर सर्व सत्य समोर आलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.