महादेव मुंडेंच्या पत्नी, आई-वडील, मुलाकडून आत्मदहनाचा प्रयत्न
पोलिसांसोबत झटापट, पेट्रोलच्या बॉटल जप्त
बीड : खरा पंचनामा
परळीमधील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज (16 जुलै) कुटुंबासमावेत पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडील दोन पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी मुंडे आणि पोलीस यांच्यात झटापट देखील झाली.
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निघृण हत्येला तब्बल 18 महिने उलटले. मात्र अद्याप आरोपी अजूनही मोकाटच आहेत. पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायासाठी एसपी ऑफिसच्या उंबरठ्यावर चकरा मारत आहेत. परंतु न केवळ आरोपी मोकाट आहेत, तर चौकशीचाही वेग नाही. शेवटी हतबल होऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानूसार आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधिकक्ष कार्यलयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह आई-वडील आणि मुले सर्वजण पोलिसांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.