'बाहेर ये तुला दाखवतो, गद्दार कोणाला म्हणतो रे'
मुंबई : खरा पंचनामा
मराठी माणसांना मुंबईत घरी मिळाली पाहिजेत, यावरून माजी मंत्री, शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात विधानपरिषदेत वाद झाला आहे. अनिल परब यांनी 'गद्दार' शब्द वापरल्याने शंभूराज देसाई संतापल्याचे पाहायला मिळाले. गद्दार कोणाला म्हणतो रे, असा संतप्त सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला.
अनिल परब म्हणाले, "मराठी माणसाला घर मिळावे, हा कायदा आहे का? मग कायदा करावा ही आमची इच्छा आहे. सरकारी इच्छा फक्त सभागृहात असते. सभागृहाच्या बाहेर गेले की लोढा यांची दादागिरी सुरू होते. त्यामुळे आमची इच्छा आहे की, मंत्र्यांनी सांगावे, याबद्दल कायदा आणतो."
"कायदा आणल्याशिवाय मराठी माणसांना न्याय मिळणार नाही. कायदा आणतो हे सांगितलं तरी मराठी माणसांना दिलासा मिळतो. मराठी माणसांना ४० टक्क्यांची अट टाकून कायदा आणणार का?" असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. यावर शंभूराज देसाई यांनी म्हटलं, "मराठी माणसांच्या रक्षणासाठी सरकारची भूमिका आहे. अनिल परब ज्या पोटतिकडीने मराठी माणसांबद्दल भूमिका मांडताहेत, तीच आमची भूमिका आहे. पण, २०१९ ते २०२२ सरकार असताना तुम्ही अशा पद्धतीचे धोरण घेतले होते का? अशापद्धतीचा नियम आणि कायदा तुम्ही केला होता का?"
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.