दुचाकीस्वारांसाठी नवे नियम लागू
नियमभंग करणाऱ्यांवर 1 सप्टेंबरपासून मोठया दंडाची कारवाई
नवी दिल्ली : खरा पंचनामा
रस्त्यावरील अपघात कमी करणे आणि वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता नियम मोडल्यास आधीपेक्षा दंडाची रक्कम 10 पट जास्त आकारली जाऊ शकते.
हे नवीन नियम 1 मार्च 2025 पासून लागू आहेत. या बदलांमुळे दंड आकारणी वाढली असून ई-चलन प्रणाली अधिक प्रभावीपणे वापरली जात आहे.
नवीन वाहतूक नियमांतील महत्वाचे बदल :
दंड रकमेतील मोठी वाढः अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारला जाणारा दंड आता पूर्वीच्या तुलनेत १० पट जास्त आहे. यामुळे वाहन चालक नियम काटेकोरपणे पाळतील अशी अपेक्षा आहे.
ई-चलन प्रणालीचा प्रसारः वाहतूक पोलिस आता ई-चलन मशीनचा वापर करत आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने नियम मोडणाऱ्या वाहनांवर थेट ई-चलन पाठवले जाते. हे चलन नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS किंवा ईमेलद्वारे मिळते.
लायसन्स रद्द करण्याची तरतूदः गंभीर उल्लंघन किंवा वारंवार नियम मोडल्यास, जसे दारू पिऊन गाडी चालवणे, ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.
अल्पवयीन वाहन चालकांवर कडक कारवाई: १८ वर्षाखालील व्यक्ती वाहन चालवताना पकडली गेल्यास, वाहन मालक किंवा पालकांना २५,००० रुपयापर्यंत दंड आणि ३ वर्षांपर्यंत तुरुंगाची शिक्षा होऊ शकते.
वाहतूक नियम उल्लंघन : जुना दंड - नवीन दंड
हेल्मेट न घालणे : 100 - 1,000 (आणि 3 महिने लायसन्स जप्त)
सीट बेल्ट न लावणे : 100 - 1,000
सिग्नल तोडणे : 500 - 5,000
धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे : 500 - 5,000
ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे : 500 - 5,000
दारू पिऊन वाहन चालवणे : 1,000- 1,500 - 10,000 (आणि 6 महिने तुरुंगवास)
विमा नसलेले वाहन चालवणे : 200 ते 400 - 2,000
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.