'ती वळवळणारी जीभ हातात काढून...'
मुंबई : खरा पंचनामा
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील मोर्चावर ठाम असल्याचं जाहीर केलेलं असताना, भाजपा नेता त्यांना एका विधानावरुन कोंडीत पकडत आहेत. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या विधानाचा दाखला देत भाजपा नेते त्यांना लक्ष्य करत आहेत.
चित्रा वाघ यांनी इशारा दिल्यानंतर आता नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना जीभ हातात काढून देऊ अशी धमकी दिली आहे. एक्सवर त्यांनी व्हिडीओ शेअर करत मनोज जरांगेंना खडेबोल सुनावले आहेत.
"जे रक्ताने मराठे असतात ते कोणाच्या आईबाबत अपशब्द वापरणार नाहीत. ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो, त्या छत्रपती शिवरायांनी नेहमी प्रत्येक माता-बहिणीचा आदर केला आहे. जरांगे यांनी आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करत असल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य 96 कुळी मराठ्यात आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं," असं नितेश राणे म्हणाले आहेत.
"आमच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी खेळू नये. फडणवीस साहेब तुम्ही वाकड्यात शिरू नये. फडणवीस मुद्दामून आरक्षण देत नाही. मराठयांना खुन्नस देतात. दोन दिवसांपूर्वी 29 जाती फडणवीस यांनी ओबीसीत घातल्या. मराठ्यांना का देत नाही? आमच्या आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी करा. आमच्या मागण्या पूर्ण करा आम्ही मुंबईत येत नाहीत. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर सरकार उलथवून टाकू," असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
"मी फडणवीस यांच्या आईवर काहीही बोललेलो नाही. पण काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो. पण तुमच्या आईप्रमाणे आमच्याही आईला तोला. द्या आरक्षण, कोण प्रवक्ता आहे त्यांचा शेण खातो, कोण वाघीण हे ती. आमची आई रक्ताच्या थारोळ्यात मेली तेव्हा तुला नाही कळलं का? तू माझ्या नादाला लागू नको. नादाला लागली तर सगळं बाहेर काढीन," असा इशारा त्यांनी चित्रा वाघ यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.