राज्यातील 156 पोलीस निरीक्षकांना अखेर उपाधीक्षकपदी पदोन्नती
सांगलीतील बिजली, सावंत यांचा समावेश, सांगलीत मोरे, पाटील नव्याने येणार
मुंबई : खरा पंचनामा
राज्य पोलीस दलातील तब्बल 156 पोलीस निरीक्षकांना उपाधीक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने गुरुवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
पदोन्नती मिळालेल्यामध्ये सांगलीतील संजयनगरचे प्रभारी निरीक्षक सूरज बिजली यांचा समावेश असून त्यांची पदोन्नतीने महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथे बदली करण्यात आली आहे. सांगली मुख्यालयाचे प्रभारी उपाधीक्षक (गृह) तानाजी सावंत यांची कोल्हापूर पोलीस मुख्यालयाच्या उपाधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. प्रभाकर मोरे यांची पदोन्नतीने सांगलीतील आर्थिक गुन्हे शाखेच्या उपाधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यवान पाटील यांची सांगली पोलीस मुख्यालयाचे उपाधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.