Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

7 खून माफ ऐकलं होतं पण इथे तर 8 खून माफ होतात!रसिकाना सिकवेलची प्रतीक्षा

7 खून माफ ऐकलं होतं पण इथे तर 8 खून माफ होतात!
रसिकाना सिकवेलची प्रतीक्षा

सांगली : खरा पंचनामा 

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा 7 खून माफ चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. मात्र इथे 8-8 खून झाले तरी मनसबदाराला माफ केले जाते का? असा प्रश्न सामान्य प्रजा विचारत आहे. परगण्यावर मनसबदाराचा कोणताच वचक नसल्याचे दिसून येत असूनही राजा, प्रधान आणि सेनापती यांच्याकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रसिक मात्र सिकवेलच्या प्रतीक्षेत आहेत.

परगण्यात सर्व काही आलबेल असल्याची आवई मनसबदाराच्या खूष मस्कऱ्यांकडून उठवली जात आहे. त्याच्यावर सेनापती डोळे झाकून विश्वास ठेवत असल्याचे चित्र आहे. अन्य परगण्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला कोणी हात लावला तर मनसबदाराला जबाबदार धरून त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला राज दरबारी हलवण्यात येत होते. मात्र आता या लाडक्या मनसबदाराला सात खून माफ करून आठव्या खुनात देखील माफी मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

8 लक्ष होनांची मनसबदारी सहजा सहजी सोडवेल का असाही प्रश्न आहे. ही मनसबदारी मिळवण्यासाठी अनेकांचे देव पाण्यात होते. मात्र ही मनसबदारी मिळवताना दिलेले होन कामी येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 7 काय 8 काय अजून किती खून माफ होतील हे प्रजेला याची देही याची डोळा पहायला मिळण्याची शक्यता आहे.

या सर्व घटना पाहता प्रियांका चोप्रा आता 7 खून माफच्या पुढचा सिकवेल किती खून माफचा चित्रपट काढायचा या विचारात दंग आहे. एकंदरीत 7 खून माफचा सिकवेल लवकरच रसिकाना पहायला मिळणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.