मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक
दुचाकीसह 1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील वज्रचोंडे येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरून नेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरीचे दागिने असा 1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
प्रविण भगवान गायकवाड (वय २८, रा. मळणगाव, ता. तासगाव), रोहित अदिकराव सपकाळ (वय २३, रा. गौरगाव, ता. तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 21 जुलै रोजी प्रियांका यादव मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातानी त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास केले होते. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्याना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक तयार केले होते.
पथकाला दोघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी जुना माधवनगर नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याजवळ दागिने सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दागिने जप्त करण्यात आले. दोघांना तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, सहायक निरीक्षक पंकज पवार, प्रकाश पाटील, सतिश माने, संदीप नलावडे, सागर लवटे, अनिल कोळेकर, संदीप गुरव, अमर नरळे, उदयसिंह माळी, अमीरशा फकीर, मच्छिद्र बर्डे, संदीप पाटील, नागेश खरात, शिवाजी शिद, विक्रम खोत, अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.