Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

औषधी गोळया, सिरपची नशेसाठी विक्री करणाऱ्या र्रॅकेटचा पर्दाफाश ट्रॅव्हल्स बससह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त : अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची कारवाई

औषधी गोळया, सिरपची नशेसाठी विक्री करणाऱ्या र्रॅकेटचा पर्दाफाश 
ट्रॅव्हल्स बससह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त : अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची कारवाई 

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

शहरातील सिडको भागात पत्र्याच्या शेडमध्ये औषधी गोळया, सिरपचा साठा करून नशेसाठी त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी दोघांना अटक करून ट्रॅव्हल्स बस, औषधी गोळया, सिरप असा 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
सय्यद नजिरुददीन सय्यद रियाजोददीन (रा. बाबर कॉलनी, हात्तीसिंगपुरा, सिडको, छत्रपती संभाजीनगर), अमजद खान अनवर खान (रा.इकबाल नगर, नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात अंमलीपदार्थ विक्री करणारे व त्यांना पुरवठा करणारे तस्कर यांचा शोध घेत असताना सिडको पोलीस कॉलनीच्या पाठीमागील नाल्याजवळ एक पत्र्याचे शेड उभारले असुन त्यामधुन नशेच्या औषधी गोळया व सिरप यांची विक्री होत असलेबाबत माहिती निरीक्षक बागवडे यांना मिळाली.
त्यांनी पथकासह तेथे छापा टाकला. तेथे रियाजोददीन याला ताब्यात घेऊन नशा करण्याकरीता वापरले जाणा-या Nitrosun 10 या एकुण 88 औषधी गोळया जप्त करण्यात आल्या आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने इरफान घोरवडे, रा.नांदेड हा स्वतः चे फर्मच्या माध्यमातुन औषधी निर्माण कंपन्यांकडुन मोठया प्रमाणात बेकायदेशिररित्या शहरात औषधी गोळया व सिरप नशेकरीता पुरवठा करीत असल्याचे उघड झाले. त्यालाही अटक करण्यात आली. या कारवाईत ट्रॅव्हल्स बस (क्र. आर 01 P 7278),  कोडेन सिरप REXODEX-T, GLYCOFF, ZUDIK या कंपन्यांच्या एकुण १२७० औषधी बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोघांसह जागा मालका विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंमली पदार्थ प्रतिबंध विभागच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवीकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, लालाखान पठाण, संदिपान धर्मे, सतिष जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदडे, महेश उगले, छाया लांडगे, चालक पोअं काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.