Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्दमहाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश

देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश

दिल्ली : खरा पंचनामा

निवडणूक आयोगाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने देशातील 334 नोंदणीकृत पक्षाची मान्यता रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मान्यता रद्द करण्यात आलेल्या पक्षांनी 2019 पासून कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. तसेच त्यांच्या पक्षांचे कार्यालय कार्यालयांचे ठिकाण प्रत्यक्ष तपासणीत आयोगाला आढळून आलेले नाही, त्यामुळे त्यांनी या पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन आयोगाकडून जारी करण्यात आलं आहं.

खरं तर नोंदणीकृत पक्ष म्हणून राहण्यासाठी संबंधित पक्षाला निवडणूक लढवणे ही मुख्य अट आहे. 334 पक्षांनी 2019 पासून लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुका यापैकी कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेतला नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

राज्यातील नऊ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये आवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलान पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमॉक्रेटिक पार्टी, नवबहूजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डीयन, द लोक पार्टी ऑफ इंडिया, आणि युवा शक्ती संघटना या पक्षांचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.