ब्राह्मण समाजाच्या महामंडळासाठी 6 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाला अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामंडळावर तब्बल सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची संचालकपदी नियुक्ती केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समाजघटकांना खूश ठेवण्याच्या राजकीय प्रयत्नांचा हा एक भाग असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे, यामुळे ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा मिळणार आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील तरुणांना शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, वाहतूक, विपणन प्रक्रिया, साठवणूक, तसेच विविध व्यवसायिक उपक्रम उभारण्यासाठी सहाय्य केले जाणार आहे. यासोबतच तरुणांना अर्थसाहाय्य, व्याजपरतावा आणि शिक्षणासाठी मदत करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.
महायुतीतील सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार या महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मिळाले आहे. बदलापूरचे माजी नगरसेवक आशीष दामले यांची अध्यक्षपदी नियुक्ती आधीच झाली असली तरी संचालक मंडळाची निवड अनेक महिन्यांपासून रखडली होती. अखेर आता सहा शासकीय संचालकांच्या नियुक्त्यांमुळे महामंडळाच्या कामकाजाला वेग येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'मेमोरेंडम ऑफ असोसिएशन' आणि 'आर्टिकल्स ऑफ असोसिएशन' ला मंजुरी देताना सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यात -
* नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा
* कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव - मनीषा वर्मा
* वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय
* कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी
* उद्योग विभागाचे सचिव वी. अन्बलगन
* इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव - अप्पासो धुळाज यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.