Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव, 7/11 बॉम्बस्फोटांमधील मृतांना न्याय मिळाला नाही'

'राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव, 7/11 बॉम्बस्फोटांमधील मृतांना न्याय मिळाला नाही'

पुणे : खरा पंचनामा

मालेगाव बॉम्ब खटला आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला त्याचबरोबर ७/११ ट्रेन बॉम्ब ब्लास्ट यामधील बळींना न्याय मिळाला नाही. या सर्व केसमध्ये गुन्हेगार आणि कट करणारे निर्दोष सुटले. यामध्ये व्यवस्थेचे अपयश आहे. या मोठ्या गुन्ह्यांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना न्याय देऊ शकलो नाही, याला राजकारणी लोकांचा हस्तक्षेप कारणीभूत आहे. पोलिसांवर जो राजकीय दबाव येतो, त्यामुळे सत्यशोधन करण्याचा रस्ता पोलिस सोडून देतात. त्यामुळे अशा प्रकारच्या केसेस वर्षानुवर्षे चालत राहतात. यामुळे न्याय मिळाला नाही, अशी खंत माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली.

बोरवणकर या पुण्यात बोलत होत्या. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात राष्ट्रसेवा दल आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही खंत व्यक्त केली. या कार्यक्रमात डॉ. दाभोलकर यांच्या लिखाणावर आधारित पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

बोरवणकर म्हणाल्या की, मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. मी कोणत्या विषयावर बोलावे, याचा विचार करत होते. तोच माझा एक लेख प्रकाशित झाला आणि त्यावर मला २० ई-मेल आणि ८ ते १० व्हॉट्सअॅप मेसेजेस आले. त्यात काही जणांनी माझ्या धाडसाचे कौतुक केले होते. मात्र, एक धमकीचाही ई-मेल आला होता. 'या कार्यक्रमाला का जाता?' यानंतर ठरवले की, आपण याच विषयावर बोलले पाहिजे. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा संदर्भ देत खेद व्यक्त केला. या प्रकरणांमध्ये तर अद्याप खटला सुरूदेखील झाला नाही. ही परिस्थिती भयानक आणि धक्कादायक आहे.

त्या म्हणाल्या की, पोलिसांवर जेव्हा राजकीय दबाव येतो, तेव्हा सत्यशोधनाचा मार्ग पोलिस सोडून देतात. त्यामुळे अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे चालतात आणि अखेर न्याय मिळत नाही. आज जवळपास प्रत्येक विभागात राजकीय हस्तक्षेप आहे. हा हस्तक्षेप लोकहितासाठी असेल, विकासासाठी असेल, तर त्याचे स्वागत करावे, पण न्याय थांबवण्यासाठी असेल. तर त्याला कडक विरोध झाला पाहिजे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.