Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

व्हॉट्सअॅपने 98 लाख भारतीय अकाऊंट केले बॅन

व्हॉट्सअॅपने 98 लाख भारतीय अकाऊंट केले बॅन

मुंबई : खरा पंचनामा

मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअपने जून 2025 मध्ये भारतातील तब्बल 98 लाख खाती बंद केली आहेत. बनावट बातम्या, खोटी माहिती आणि प्लॅटफॉर्मचा गैरवापर यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे मेटाच्या ताज्या अनुपालन अहवालात नमूद आहे. डिजिटल मीडिया नीतिशास्त्र संहिता 2021 नुसार ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे व्हॉट्सअॅपच्या पारदर्शकता आणि सुरक्षिततेच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

जून 2025 मध्ये व्हॉट्सअॅपला खाते बंद करण्यासाठी जून 2025 मध्ये व्हॉट्सअॅपला खाते बंद करण्यासाठी 16,069 विशिष्ट तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यावर सर्वांवर कारवाई करण्यात आली. यापैकी 19.79 लाख खाती ही वापरकर्त्यांच्या तक्रारींमुळे निष्क्रिय करण्यात आली. एकूण 23,596 तक्रारींमध्ये खाते सहाय्य, उत्पादन समस्य आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांचा समावेश होता. यापैकी 1,001 खात्यांवर मूल्यमापनानंतर कारवाई झाली, ज्यामध्ये 756 खाती थेट बंद करण्यात आली.

व्हॉट्सअपने प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता राखण्यासाठी तीन स्तरांची गैरवापर शोध यंत्रणा लागू केली आहे. यामध्ये खाते तयार करताना, संदेश पाठवताना आणि वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया जसे की ब्लॉक आणि तक्रारी यांचे मूल्यमापन केले जाते. ही यंत्रणा स्पॅम, खोटी माहिती आणि हानिकारक वर्तन ओळखण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी डिझाइन केली आहे.

भारतीय नियमांनुसार, 50,000 हून अधिक वापरकर्ते असलेल्या सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना मासिक अनुपालन अहवाल प्रकाशित करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या वापरकर्त्याला त्यांचे खाते चुकीने बंद केल्याचे वाटत असेल, तर ते सरकारने नेमलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपील करू शकतात. मात्र, व्हॉट्सअॅपचा दावा आहे की बहुतेक बंदी स्पष्ट गैरवापरामुळे केली जाते आणि चुकीची बंदी दुर्मिळ आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.