भारतीय जनता पार्टी - जैन प्रकोष्ठचा वर्धापन दिन उत्साहात
सांगली : खरा पंचनामा
भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठचा वर्धापन दिन सांगली येथे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच भाजपा आणि जैन प्रकोष्ठचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत, रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार श्री. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. यावेळी माननीय आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी जैन प्रकोष्ठाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आणि समाजहितासाठी नेहमी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "जैन समाजाला भक्कम राजकीय व्यासपीठ मिळावे, शासन दरबारी त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जावी आणि समाजाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण व्हावे, यासाठीच जैन प्रकोष्ठ ची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जैन प्रकोष्ठाचे संघटन प्रभावीपणे उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुढील काळात अधिकाधिक लोकांना जैन प्रकोष्ठ मध्ये सहभागी करून संघटन मजबूत करण्याचा आमचा संकल्प आहे."
या वर्धापन दिन सोहळ्यास भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नीताताई केळकर, भाजपा महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्ष स्वातीताई शिंदे, शैलेश पवार, प्रकोष्ठचे महानगराध्यक्ष शांतिनाथ कर्वे, प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष वैभव चौगुले, जैन प्रकोष्ठचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शितलकुमार पाटील, महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हापुरे, जिल्हा सचिव महेश मुळे, प्रकोष्ठचे मिरज तालुका अध्यक्ष श्री. दीपक पाटील, संतोष कोल्हापुरे, माजी नगरसेवक शितल पाटील, वैभव पाटील (कोथळी) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.