रेव्ह पार्टीप्रकरणी रुपाली चाकणकरांचे 'एसआयटी'साठी पोलिस महासंचालकांना पत्र
पुणे : खरा पंचनामा
खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून एकनाथ खडसे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात आरोप प्रत्योरोप सुरू आहेत. आता चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात मानवी तस्करीबाबत तपास करण्यासाठी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.
चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे की, 'पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा अश्लिल आणि अनैतिक वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच आरोपी प्रांजल खेवलकर यानी याआधीही वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल बुक करून एजंटमार्फत महिलांना आणल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फडवणूक, दबाव, इतर कोणतेही माध्यम.. महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी.'
'हे प्रकरण, केवळ एका पार्टीपुरते मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटीत गुन्हेगारी असून अतिशय भयावह व घातक परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसेच कायदयानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभुमीवर विशेष तपास पथकाची स्थापना करुन प्रकरणी न्यायोचित, सखोल चौकशी वेळेत व्हावी.', असे पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात रुपाली चाकणकर यांनी नमूद केले.
महिला अधिकाऱ्याचा समावेश आलेली एसआयटी एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी व्हावी. तपासाअंती दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल, असे रुपाली चाकणकर यांनी पत्राद्वारे पोलिस महासंचालकांना कळवले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.