Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डीव्हीआर हस्तगत करताना पंचनामा केला होता का..?उच्च न्यायालयाची सांगली पोलिसांना विचारणा : पुढील सुनावणी कोल्हापुरात

डीव्हीआर हस्तगत करताना पंचनामा केला होता का..?
उच्च न्यायालयाची सांगली पोलिसांना विचारणा : पुढील सुनावणी कोल्हापुरात

मुंबई : खरा पंचनामा

विटा येथील वकील विशाल कुंभार यांना झालेल्या मारहाण प्रकरणात डीव्हीआर हस्तगत करताना पंचनामा केला होता का..? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेच्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या दोन सदस्य पिठाने बुधवारी पोलिसांना केली. याचीकेची पुढील सुनावणी १९ ऑगस्टला कोल्हापूर येथील मुंबई हायकोर्ट सर्किट बेंच पुढे चालणार आहे.

विटा येथील ॲड. विशाल कुंभार यांना पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाण प्रकरणी कुंभार यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचीका दाखल केली आहे. मंगळवारी उच्च न्यायालयाच्या द्वि सदस्य पिठाने  बुधवारी सुनावणीवेळी डीव्हीआर जसा होता तसा कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज पोलिसांकडून डीव्हीआर हजर करण्यात आला. सुनावणी वेळी याचीकाकर्त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी विविध मुदयांवर युक्तिवाद करताना म्हटले की, डीव्हीआर मधील सिसिटीव्ही फुटेज मध्ये कुंभार यांनी केलेल्या आरोपांना पुष्टीदायक पुरावा म्हणजे कुंभार यांना कशा प्रकारे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी वागणूक केली व हे स्पष्ट दिसत आहे.  कुंभार यांच्या घरातून डीव्हीआर नेत असताना कोणत्याही प्रकारचा पंचनामा जो कायद्याला अभिप्रेत आहे असा केलेला नाही. ज्या पद्धतीने डीव्हीआर पोलिसांनी कुंभार यांच्या घरातून कोणताही पंचनामा न करता नेला हे पाहता हा चोरीचा किंवा दरोड्याचा गुन्हा होतो का असा मुद्दा सुद्धा न्यायालयात उपस्थित केला. 

यावर न्यायालयाने डीव्हीआर हस्तगत करताना पंचनामा केला होता का..? अशी विचारणा पोलिसांना केली. यावर पोलिसांतर्फे सहा. सरकारी वकील गावंड यांनी सांगितले की त्या दिवशी जे घडले ते जतन करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी डीव्हीआर नेला होता. तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयात डीव्हीआर हजर पण केला आहे असे सांगितले . यावर न्यायालयाने हा डीव्हीआर मुद्देमाल म्हणून तूर्त तरी पोलिसांच्या ताब्यात राहील असे स्पष्ट करीत पुढील सुनावणी कोल्हापूर येथील मुंबई हायकोर्ट सर्किट बेंच पुढे १९ ऑगस्टला चालेल असेही सांगितले. याचिकाकर्त्यां तर्फे ॲड. अनिकेत निकम व ॲड. सुदत्त पाटील हे काम बघत आहेत. तर पोलिसांतर्फे सहा. सरकारी वकील गावंड काम बघत आहेत. उच्च न्यायालयातील याचिका सुनावणी वेळी विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. विजय जाधव, ॲड. प्रमोद सुतार, ॲड. विशाल कुंभार, ॲड. सचिन जाधव उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.