Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा

महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा

पुणे : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेले प्रांजल खेवलकर यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत.

गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, सायबर पोलिसांनी आयटी अॅक्ट 66E आणि BNS कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामुळे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर खेवलकरच्या अडचणीत अधिकच वाढ झाली असून त्याच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकरांवर एका महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, IT Act 66E, BNS 77 अन्वये गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहमती नसताना फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा खेवलकर यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी आयटी अॅक्ट 66E आणि BNS कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामुळे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर खेवलकरच्या अडचणीत अधिकच वाढ झाली असून त्याच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खेवलकर हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.