स्वातंत्र्यदिनानिमित्त नाभिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र नाभिक महामंडळ व नाभिक कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत सेना महाराज मंदिर गांवभाग सांगली येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी बक्षीस या कार्यक्रमात नाभिक समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीय सहाय्यक आयुक्त वृषाली अभ्यंकर - फाटक तसेच उदय बेलवलकर व भा.ज.पा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष संदीप कुकडे उपस्थित होते.
यावेळी नाभिक समाज सांगली जिल्हाध्यक्ष सागर चिखले, नाभिक कर्मचारी संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य साळुंखे, जिल्हा युवक अध्यक्ष धनंजय साळुंखे, सांगली शहराध्यक्ष गणेश साळुंखे, कुपवाड शहराध्यक्ष प्रल्हाद कबुरे, जोतीराम काळे, पवन यादव, संतोष खंडागळे, शिवाजी साळुंखे, कल्लाप्पा कोरे, शैलेश चव्हाण, दादा गंगाधर यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.