शाळकरी मुलांचा जीव वाचवणारे मुंबई पोलिस ठरले हिरो!
मुंबई : खरा पंचनामा
मुसळधार पावसामुळे सोमवारी मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. या पावसात माटुंग्यातील डॉन बॉस्को स्कूलची बस पाण्यात अडकली. बसमध्ये सहा लहान मुले, दोन महिला कर्मचारी आणि बस चालक जवळपास एक तास अडकले होते.
परिस्थिती गंभीर होताच डीसीपी झोन ४च्या अधिकारी सुश्री रागसुधा आर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली माटुंगा पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवले. अवघ्या दोन मिनिटांत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन धाडसाने मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
पोलिसांनी पाण्यात उतरून एकामागोमाग एक मुलांना बाहेर आणले. काहींना खांद्यावर घेतले, तर काहींना हात धरून सुरक्षित बाहेर आणले. घाबरलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर पोलिसांच्या मदतीनंतर पुन्हा हसू परतले. यानंतर मुलांना माटुंगा पोलिस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना बिस्किटे देऊन शांत करण्यात आले. या संवेदनशील व वेळेवर केलेल्या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पावसाच्या थैमानात जीव धोक्यात घालून चिमुकल्यांचा जीव वाचवणारे माटुंगा पोलीस खरेच मुंबईकरांचे खरे 'रक्षक' ठरले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.