"मतचोरीच्या आरोपावर आयोगाने उत्तर द्यावं, भाजपने नाही"
नागपूर : खरा पंचनामा
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सध्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित करुन सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला घाम फोडला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांच्याकडून मतचोरी होत असल्याचे सांगितले. त्यांच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले. तसेच भाजप नेत्यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आता या वादात राहुल गांधींना विरोधी पक्षांची साथ मिळत आहे. शरद पवार यांनी राहुल गांधींना भक्कम साथ दिली आहे. नागपूर दौऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाने उत्तरं द्यायला हवीत भाजपने नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार पुढे म्हणाले, राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलाय. आयोगावर त्यांनी आरोप केले आहेत. पण यावर उत्तर देण्यासाठी भाजप किंवा मुख्यमंत्री पुढे येतात. याचं कारण काही मला समजू शकलेलं नाही. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे. भाजपकडून नाही. राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगानेच उत्तर द्यायला हवं. उत्तर देण्याऐवजी त्यांच्याकडून शपथपत्र मागितलं जात आहे जे अत्यंत चुकीचं आहे असे शरद पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.