शिवसेना कोणाची? लवकरच 'सर्वोच्च' निकाल
नवी दिल्ली : खरा पंचनामा
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे. मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढल्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारमधील 40 आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या मदतीने सत्तेत आलेल्या सरकारने उर्वरित कार्यकाळ पूर्ण करुन आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेत आलेलं आहे. असं असतानाही पक्षावरील हक्कासंदर्भातील निकाल अद्याप लागलेला नाही. मागील साडेतीन वर्षांपासून या प्रकरणावर केवळ तारखा पडत असून निकाल लागलेला नाही.
निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिलेला असला तरी त्याविरोधातही ठाकरेंच्या सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली. या प्रकरणातील सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावरुन शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचा हक्क असणार की उद्धव ठाकरेंचा हे कोणत्या तारखेला ठरणार हे निश्चित झालं आहे.
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, 14 जुलै 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत प्रकरण 20 ऑगस्ट 2025 रोजी यादीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता संगणक निर्मित यादीनुसार ही सुनावणी 8 ऑक्टोबर 2025, बुधवारी पुन्हा होणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून झाल्यावर कोर्ट अंतिम निर्णय देईल. त्यामुळे शिवसेना कोणाची, याबाबतचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच याचा फैसला होणार आहे. ते दुसऱ्या घटनापीठाचे सदस्य असल्याने सुनावणी लांबणीवर गेली आहे. 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार आहे.
शिवसेनेची सुनावणी गेल्या 3 वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे शिवसेनेची सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी केलीय सरन्यायाधीश भूषण गवई यांना केलीय. तीन वर्षांपासून तारीख पे तारीख मिळतेय. त्यामुळे सुनावणी घेऊन न्याय देण्याची विनंती ठाकरेंनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.