Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"माझ्या जीवाला धोका" ; राहुल गांधींकडून पुणे कोर्टात अर्ज

"माझ्या जीवाला धोका" ; राहुल गांधींकडून पुणे कोर्टात अर्ज

पुणे : खरा पंचनामा 

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी बुधवारी पुणे न्यायालयास सांगितले की, सद्यस्थितीतील राजकीय संघर्ष आणि मानहानी खटल्यातील तक्रारदार सात्यकी सावरकर यांची वंशावळ पाहता, त्यांना त्यांच्या जीवाला धोका वाटत आहे.

राहुल गांधींनी मानहानीच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष खासदार/आमदार न्यायालयास आग्रह केला की, त्यांची सुरक्षा आणि खटल्याच्या निष्पक्ष सुनावणीबाबत, ज्या गंभीर शक्यताही त्यांनी व्यक्त केल्या आहेत, त्याची न्यायालयीन दखल घेतली जावी. याचबरोबर राहुल गांधींनी राज्याकडून प्रतिबंधात्मक संरक्षणही मागितले.

याचिकेत म्हटले आहे की, प्रतिबंधात्मक संरक्षण केवळ सुज्ञ पाऊल नाही, तर हे राज्याचे संविधानिकदायित्व देखील आहे. तसेच वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हे पाऊल सध्याच्या कार्यवाहीची निष्पक्षता, अखंडता आणि पारदर्शकता सुरक्षित राखण्यासाठी संरक्षणात्मक आणि सावधगिरीचा उपाय आहे.

याशिवाय याचिकेत असाही उल्लेख केला गेला आहे की, २९ जुलै रोजी दाखल एका लेखी निवेदनात, सात्यकी सावरकरांनी स्पष्टपणे मान्य केलं आहे की, ते नथूराम गोडसे आणि गोपाल गोडसे - महात्मा गांधींच्या हत्येतील मुख्य आरोपी यांचे मातृपक्षाकडून थेट वंशज आहेत आणि याचबरोबर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.

तर याचिकेत असंही म्हटलं आहे की, तक्रारदाराच्या वंशाशी संबंधित हिंसक आणि असंविधानिक प्रवृतींचा दस्तऐवजीकरण इतिहास पाहता, स्पष्ट, तर्कसंगत आणि दाट शक्यता आहे की, राहुल गांधींना नुकसान पोहचवण्यासाठी, चुकीच्या प्रकरणात फसवण्यासाठी किंवा अन्यप्रकारे लक्ष्य केले जाईल.

याचबरोबर याचिकेत असही म्हटलं गेलं आहे की, महात्मा गांधींची हत्या ही एक आवेगपूर्ण कृती नव्हती, तर तो एक सुनियोजित कटाचा परिणाम होता. जी एका विशिष्ट विचारसरणीत रुजलेली होती आणि निःशस्त्र व्यक्तीविरुद्ध योजनाबद्द हिंसेच्या रूपात परिणत झाली. अशा वंशाशी संबंधित गंभीर इतिहास पाहता, प्रतिवादींना वास्तविक आणि तर्कसंगत भीती आहे की, इतिहासाला पुनरावृत्ती होवू दिली नाही पाहीजे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.