"आंदोलन नेमकं का होतंय हे मला कळत नाहीये"
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आंदोलकांनी बुधवारी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. शुक्रवारी आंदोलक मुंबईतल्या आझाद मैदानात दाखल होतील. शनिवारी सकाळपासून मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषण सुरु करणार आहेत.
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यासाठी हे आंदोलन पार पडणार आहे.
राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल होणार आहे. आंदोलक मुंबईच्या वेशीवर आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अनाकलनीय विधान केलं आहे. हे आंदोलन नेमकं का होतंय, हेच मला कळत नाही.. असं फडणवीस म्हणाले आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारल होतं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय झाले आहेत. १५ वर्षे अण्णासाहेब पाटील महामंडळ बंद होतं. मी ते उभं केलं त्यामुळे दीड लाख उद्योजक त्यातून उभे राहिले. 'सारथी'च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला. अडीच वर्षे जे सरकार होतं, त्या सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी घेतलेला एक निर्णय दाखवा.. ते दाखवू शकणार नाहीत.
फडणवीस पुढे म्हणाले की, लोकशाही पद्धतीने होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाचा आदर आहे. मुळात हे आंदोलन का होतंय, हेच मला कळत नाहीये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यांची ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी आहे, मात्र आधीच ओबीसीमध्ये ३५० जाती आहेत. मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण आहे. तरीही आंदोलकांशी चर्चा करु आणि उपोय काढू.. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.