Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या मिरजेतील दोघांना शिक्षा

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या मिरजेतील दोघांना शिक्षा

सांगली : खरा पंचनामा

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी दोघांना भारतीय दंड संहिता कलम ३५३ सह ३४ नुसार प्रत्येकी एक वर्ष साधा कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, कलम ३३२ सह ३४ नुसार प्रत्येकी एक वर्ष साधा कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, कलम ५०४ सह ३४ नुसार प्रत्येकी सहा महिने साधा कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, अति. सरकारी वकील सौ. आर. सी. नरवाडकर व सौ. यु. बी. करवते यांनी काम पाहिले.

कैस सलीम शेख (वय ३०),  रमिज रियाज मुल्ला (वय २७, दोघे रा. माजी सैनिक वसाहत, राममंदीर जवळ, मिरज) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. ३१ जानेवारी २०१९ रोजी मिरज शहरातील युनिक प्लाझा सदनिका परिसरात सिव्हील हॉस्पीटल ते कर्मवीर भाऊराव पाटील चौकाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर आरोपींचे चिकन ६५ चा गाडा होता. गाडा विना परवाना अतिक्रमीत होता. त्यामुळे सदरचा गाडा यातील फिर्यादी महानगरपालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त संभाजी ज्ञानू मेथे व त्यांचे पथकातील कर्मचारी काढत होते. तेव्हा आरोपींनी फिर्यादी व कर्मचारी यांच्या सरकारी कामात अडथळा आणून त्यांना धक्काबुक्की केली व फिर्यादीस 'तु कोण सांगणार तुला बघुन घेतो' असे म्हणत फिर्यादीच्या अंगावर हातगाडा ढकलून दिला. या प्रकरणाची फिर्याद मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३३२, ५०४ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर खटल्यातील साक्षी पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या खटल्यात मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार शशिकांत पाटील व पैरवी कक्षाचे सहकार्य लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.