Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता दिवसातून दोन वेळा!

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता दिवसातून दोन वेळा!

कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर शहराला मुंबईसोबत जोडणाऱ्या हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत या मार्गावर केवळ एकच विमानसेवा उपलब्ध होती, त्यामुळे दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या.

प्रवाशांच्या सोयीसाठी इंडिगो एअरलाइन्सने पुढाकार घेतला असून 11 नोव्हेंबरपासून कोल्हापूर-मुंबईदरम्यान दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सकाळी लवकर मुंबईला जाऊन काम आटोपून रात्री परत येणे शक्य होणार आहे.

सध्याच्या विमान कंपनीच्या 'ना-हरकत' प्रमाणपत्रामुळे इंडिगोला या मार्गावर सेवा सुरू करण्यात अडचण येत होती. हा मार्ग 'उडान' योजनेत असल्याने ही मर्यादा होती. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात या योजनेची मुदत संपत असल्यामुळे अन्य विमान कंपन्यांसाठी हा मार्ग खुला झाला आहे. इंडिगोने कोल्हापूर-मुंबईसाठी मागणी केलेल्या मार्गाला मंजुरी मिळाली असून 11 नोव्हेंबरपासून सकाळी आणि रात्री अशा दोन विमानसेवा कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर या मार्गावर दोन नव्या सेवा सुरू होणार आहेत.

कोल्हापूर-मुंबईदरम्यान विमानांचे संभाव्य वेळापत्रक
मुंबई-कोल्हापूरः पहाटे 6:05 वाजता मुंबईहून निघेल आणि सकाळी 7:00 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
कोल्हापूर-मुंबईः सकाळी 7:35 वाजता कोल्हापूरहून निघेल आणि सकाळी 8:30 वाजता मुंबईला पोहोचेल.
ही सेवा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालवली जाईल.

मुंबई-कोल्हापूरः रात्री 7:10 वाजता मुंबईहून निघेल आणि रात्री 8:05 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
कोल्हापूर-मुंबईः रात्री 8:35 वाजता कोल्हापूरहून निघेल आणि रात्री 9:35 वाजता मुंबईला पोहोचेल.
रात्रीची ही सेवा नवी मुंबई विमानतळावरून चालवली जाईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.