Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पडवळवाडी येथे दीड कोटींची गोवा बनावटीची दारू जप्तवाहनासह १.७८ कोटींचा मुद्देमाल हस्तगत ः राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्तांच्या पथकाची कारवाई

पडवळवाडी येथे दीड कोटींची गोवा बनावटीची दारू जप्त
वाहनासह १.७८ कोटींचा मुद्देमाल हस्तगत ः राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्तांच्या पथकाची कारवाई

कोल्हापूर : खरा पंचनामा

जिल्ह्यातील पडवळवाडी येथे ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यावेळी दीड कोटींची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. ट्रकसह एकूण १.७८ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या भरारी पथकाने सोमवारी ही कारवाई केली.

शैलेश जयवंत जाधव (वय ३६, रा. कचरे गल्ली, इस्लामपूर, जि. सांगली), वासुदेव केशवनाथ मुंढे (वय ४२, रा. विठ्ठलवाडी, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेशोत्सव, आगामी निवडणुका आणि महाराष्ट्रात वाढलेले दारूचे दर या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यात गोवा बनावटीसह महाराष्ट्रात प्रतिबंधित असणाऱ्या दारूची तस्करीवर वाॅच ठेवून कारवाई करण्याच्या सूचना विभागीय उपायुक्त श्री. चिंचाळकर यांनी सर्व भरारी पथकांना दिल्या होत्या. श्री. चिंचाळकर यांच्या भरारी पथकाला एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने पडवळवाडी परिसरात सापळा रचला होता. माहितीप्रमाणे ट्रक (एमएच १२ व्हीटी ७४०३) तेथे आल्यानंतर पथकाने तो अडवला. त्याची तपासणी केल्यावर त्यामध्ये राॅयल ब्लू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ६७ हजार २०० बाटल्या (१४०० बाॅक्स) सापडले. त्याची किंमत दीड कोटी रूपये आहे. या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून एकूण १.७८ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्या आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे, सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारूती पोवार, विशाल आळतेकर, राहुल कुटे, योगेश शेलार, राहुल संकपाळ, विनोद बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गणेशोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच महाराष्ट्रात वाढलेल्या मद्याच्या दराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात गोवासह अन्य बनावटीच्या दारूची विक्री, तस्करी, साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.