Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमली पदार्थ विक्रेत्यांसोबत आर्थिक व्यवहार करणारा पोलिस अंमलदार निलंबित

अमली पदार्थ विक्रेत्यांसोबत आर्थिक व्यवहार करणारा पोलिस अंमलदार निलंबित

पुणे : खरा पंचनामा

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे अमली पदार्थ विक्रेत्यासोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याकडून अवैध धंदे चालवण्यास प्रोत्साहन देत त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणात सदर पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत नवनाथ कांताराम शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्टला पुणे पोलिसांनी सहकारनगर पोलिस ठाण्याचा हद्दीत सुरू असलेल्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई केली. दरम्यान, एका तरुणाकडून यावेळी ५ किलो गांजा मिळून आला होता. तसेच इतर ४ जणांवर अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारवाई करण्यापुर्वी पोलिसांना एक संदेश मिळाला होता.

दरम्यान या प्रकरणातील चौकशीमध्ये स्वारगेट पोलीस ठाण्यातील नवनाथ शिंदे या कर्मचार्याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित पोलिस शिपाई हा ड्रग्स विक्री प्रकरणातील असलेल्या आरोपींना मदत करत असून सहकारनगर पोलीस स्टेशनचा कलेक्शनचे काम करतो. तसेच तो या गांजा व्यवसायात भागीदार असल्याचीही चर्चा आहे. अमली पदार्थांच्या व्यवसायात भागीदार असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे थेट NDPS नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

पुणे शहरात सर्व अवैध धंदे बंद झाले आहेत. पण हा पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या हद्दीत स्पा, पिठा, मटका, क्लब असे सर्व प्रकारचे अवैध धंदे चालवत आहे. असे या मेसेज मधील मजकूर होता. याबाबत अधिक तपास केला असता गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये नवनाथ शिंदे यांचा नंबर "एन.बी." या नावाने सेव्ह केला होता. यावेळी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता नवनाथ शिंदे सहकारनगर पोलीस स्टेशन येथे वसुलीचे काम करता असे त्याने सांगितले. यावरून शिंदे यास शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.