Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात रक्षाबंधन (सुरक्षा-वचनबंध) उत्साहात

मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात रक्षाबंधन (सुरक्षा-वचनबंध) उत्साहात

मिरज : खरा पंचनामा

माता-भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा, तसे केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात मुले येणार नाहीत. आपल्या मुलांना चांगले वळण, चांगल्या सवयी लागणार असेल आणि त्यांच भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल, अशाच व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा, असे आवाहन मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी केले. 
मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "रक्षाबंधन (सुरक्षा-वचनबंध) हा कार्यक्रम" प्रसंगी प्रणील गिल्डा हे बोलत होते. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या "पोलीस काका-पोलीस दीदी" व "पोलीस जनता-सुसंवाद" या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी "रक्षाबंधन (सुरक्षा-वचनबंध) हा कार्यक्रम" आयोजन केले होते. 
मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, उपनिरीक्षक विनोद शिंदे, उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमास मिरज शहरातील सामाजिक संस्था, तसेच महिला भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.