नशेसाठी ट्रेमीमाईड इंजेक्शनचा साठा करणाऱ्या सहा जणांना अटक
2.65 लाखांचे 558 इंजेक्शन जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
ट्रेमीमाईड इंजेक्शनचा साठा करून नशेसाठी विक्री करण्याऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ट्रेमीमाईड इंजेक्शनच्या दहा मिलीच्या 558 बाटल्या, एक दुचाकी असा 2.65 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
अशपाक बशीर पटवेगार (वय ५१, रा. पत्रकारनगर, सांगली), यश संजय मोरे, (वय २६, रा. खणभाग, शांतीनगर, सांगली), ओंकार प्रकाश कुबसद, (वय २४, रा. गणेशनगर, स्विमिग टैकजवळ, सांगली), दिलीप विश्वनाथ बंडगर, रा. करोली टी, ता. कवठेमहांकाळ), तेजस शंकर हेळवी, रा. नेलकरंजी, ता. आटपाडी) अविनाश हणमंत रणदिवे, रा. दिघची ता. आटपाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थांची विक्री, साठा, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर यांचे एक पथक तयार केले होते. पथकाला सांगलीतील पत्रकार नगर येथे एकजण दुचाकीवरून (एम एच १० ई डी ०१७१) नशेसाठी इंजेक्शन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने सापळा रचून त्या दुचाकीवरील आशपाक पटवेगार याला थांबवले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केल्यावर त्यात ट्रेमीमाईड इंजेक्शन सापडली त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने त्या इंजेक्शनच्या बाटल्या त्याचे ओळखीचा यश मोरे याला या अगोदर काही बाटल्या दिल्या असून त्याने सदर बाटल्या ओंकार कुबसद यांच्या विश्रामबाग येथील दुकानात विक्रीसाठी ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने ओंकार कुबसद याच्या दुकानात जावुन त्याला इजेक्शनच्या बाटल्याबाबत विचारणा केल्यावर त्याने त्याच्याकडील ट्रेमीमाईड इंजेक्शनच्या १० बाटल्या काढून दिल्या तसेच वेळोवेळी त्याचे ओळखीचे कवठेमहांकाळ येथील दिलीप बंडगर, तेजस हेळची आणि अविनाश रणदिवे यांना विक्री करीता दिली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने सहाही जणांना अटक केली. त्यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, अन्न व औषध प्रशासनच्या सहा. आयुक्त, जयश्री सवदत्ती, आमसिंध्द् खोत, बसवराज सिरगुप्पी, गुंडोपंत दोरकर, बाबासाहेब माने, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, चालक गणेश शिंदे, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील, शांता कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.