न्या. यशवंत वर्मांना हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारला
नवी दिल्ली : खरा पंचनामा
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यासाठी १४६ खासदारांनी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आल्याची घोषणा ओम बिर्ला यांनी मंगळवारी केली.
लोकसभेत ही घोषणा करताना ओम बिर्ला म्हणाले की, न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. लोकसभेच्या अध्यक्षांनी स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता बी.व्ही. आचार्य यांचा समावेश आहे. समिती लवकरात लवकर आपला अहवाल सादर करेल. न्यायमूर्ती वर्मा यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत प्रलंबित राहील, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.