सवा लाखासाठी अमोलने केली आदळआपट पण कारवाई करावी लागली
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकाला वाचवण्यासाठी अमोलने सवा लाखांसाठी चांगलीच आदळ आपट केली. पण त्याने नकार दिल्याने त्याच्यावर 'बुड' टेकवून कारवाई करावी लागली. याची जोरदार चर्चा सुरु आहे.
सध्या सरकारला खुश करण्यासाठी जोरदार कारवाया केल्या जात आहेत. काही अशीच एक मोठी कारवाई करण्यात आली. मुख्य संशयिताने विश्रामबाग येथे 'बुड' टेकवणाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर कारवाई करणारे तेथे पोहोचले. त्यानंतर तोडपाणी करण्यात पटाईत असलेल्या अमोलने सवा लाखांसाठी चांगलीच आदळ आपट केली.
बराच वेळ याबाबत चर्चा सुरु होती. पण संबंधिताने परिस्थिती नसल्याचे सांगून कोणालाच 'बुड' टेकवून दिले नाही. त्यामुळे तोडपाणी फेमचे सगळे प्रयत्न वाया गेले. तोडपाणी न झाल्याने 'बुड' टेकवणाऱ्यावर कारवाई करावी लागल्याची सांगलीत जोरदार चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.