सांगली पोलीस दलाच्या वायरलेस विभागास राज्यात प्रथम क्रमांक
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र राज्य दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मुल्यांकनात सांगली जिल्हयाने उल्लेखनीय यश मिळवले असून सांगली जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन, पुणेचे अपर पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मुल्यांकनात सांगली विभागाने आपल्या तांत्रिक कौशल्ये व नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रशासकीय सुसूत्रतेमुळे तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक क्षेत्रात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे हा मान सांगली जिल्हयास मिळाला आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त रिपीटर उभारणी करुन मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवणेत आला होता. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षामध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याचा फिड पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी हे प्रत्येक पोलीस ठाणे अंमलदार यांचेशी प्रत्यक्ष तात्काळ संपर्क करु शकतात. तसेच त्यांचे कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे सोईचे झाले आहे.
सांगली विभागाला राज्यातील २८ युनिटमधून पहिला क्रमांक मिळाला आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत ०४ प्रशिक्षणार्थी निवडून तांत्रिक कामात त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्यात येत आहे.
प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन केला सन्मान
सांगली जिल्हयाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व
परिवहन विभाग, पुणे येथे झालेल्या एका सन्मान समारंभात अपर पोलीस महासंचालक दिपक पांडये यांचे हस्ते सांगली जिल्हा वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णु कांबळे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.
वायरलेस विभागाच्या या उल्लेखनीय कार्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.