Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मायर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजच्या ट्रस्टी स्वाती कराड चाटे यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम

मायर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजच्या ट्रस्टी स्वाती कराड चाटे यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम

सांगली : खरा पंचनामा 

येथील मायर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेज, सांगलीच्या ट्रस्टी व सेक्रेटरी जनरल स्वाती कराड चाटे यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयटी ज्युनिअर कॉलेज, सांगली युनिटतर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी कुपवाड येथील वृद्ध सेवाश्रमाला भेट देऊन तेथे धान्य, किराणा साहित्य तसेच दैनंदिन जीवनोपयोगी वस्तू वाटप केल्या.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून समाजाप्रती बांधिलकी जपली. प्राचार्य डॉ. केदार रोकडे यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती, जबाबदारी आणि समाजाशी घट्ट नाते निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले. या उपक्रमासाठी सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच संस्थेकडून प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. ज्योती जोतवानी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.