राज्यातील पदोन्नती झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 364 सहायक पोलीस निरीक्षकांना निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली होती. याबाबतचे आदेश गुरुवारी काढण्यात आले होते. मात्र मॅट कोर्टात याबाबत अपील करण्यात आल्याने या पदोन्नती झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश शुक्रवारी विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील यादव यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, या कार्यालयाकडून संदर्भाधिन आदेशान्वये सपोनि ते पोनि पदोन्नतीचे आदेश निर्गमित झालेले आहेत. तथापि, मा.म.प्र. न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्र.८३४/२०२५ अनुषंगाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन पत्र क्र.न्यायाप्र १७२५/प्र.क्र.१३८/आरक्षण २, दि.२१.०८.२०२५ अन्वये शासन निर्णय दि.२९.०७.२०२५ मधील तरतुदीच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे सर्व प्रशासकीय विभाग यांना कळविलेले आहे.
तरी, संबंधित सर्व घटक प्रमुख यांना कळविण्यात येते की, सदर पदोन्नतीच्या आदेशातील कोणत्याही अधिकाऱ्यास पदोन्नतीवर हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येऊ नये. तसेच, ज्या घटकाकडून अधिकारी कार्यमुक्त झाले असतील व ते ज्या घटकात पदोन्नतीवर हजर होण्यासाठी आले आहेत अशा अधिकाऱ्यांना हजर न करुन घेता त्यांना त्यांच्या मूळ घटकात परत पाठविण्यात यावे व पुढील आदेशाची वाट पाहावी, असे या आदेशात म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.