कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या, ओव्हरस्मार्ट अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करा
सांगलीतील आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचना
सांगली : खरा पंचनामा
कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना तसेच फिर्यादींचे मुद्देमाल परत देताना कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच ओव्हरस्मार्ट अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करावी. अशा अंमलदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करा अशा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या.
गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षक फुलारी यांनी शनिवारी सांगलीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी गुन्ह्यांच्या तपासात काही अंमलदार ओव्हरस्मार्टपणा दाखवत असल्याबाबत आलेल्या तक्रारी तसेच माध्यमांतील बातम्यांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. अनेकदा गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर फिर्यादीला त्याचा पूर्ण मुद्देमाल परत देताना ओव्हरस्मार्ट करत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगून अशा अंमलदारांवर थेट निलंबनाची कारवाई करावी अशी सूचना दिली आहे.
नागरिकांकडून अंमलदारांबाबत केल्या जाणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शिवाय माध्यमांमधूनही काही अंमलदार ओव्हरस्मार्टनेस करत असल्याच्या बातम्या आल्याचे सांगत कारवाईच्या सूचना दिल्या. शिवाय अशा अंमलदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा अशाही सूचना महानिरीक्षक फुलारी यांनी या बैठकीत दिल्या. सांगली, मिरजेतील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासंदर्भातही त्यांनी सूचना केल्या. प्रलंबित गुन्ह्यांची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तैनात पोलिस बंदोबस्त, उपाययोजना याबाबतचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, सर्व उपअधीक्षक, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, यांच्यासह मुख्यालयातील, सांगली, मिरज शहरातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.