Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील गणेश विसर्जन मार्गाची विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केली पाहणीपहा व्हिडीओ

मिरजेतील गणेश विसर्जन मार्गाची विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केली पाहणी
पहा व्हिडीओ

मिरज : खरा पंचनामा

मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक पश्चिम महाराष्ट्रातील भक्तांचे आकर्षणाचे केंद्र आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर सर्वाधिक काळ गणेशोत्सव मिरजेत साजरा केला जातो. यावेळी होणारी भाविक, नागरिकांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त आणि विसर्जन स्थळाचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पाहणी करून आढावा घेतला.


मिरजेत सुमारे 350 सार्वजनिक मंडळांनी गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे. यापैकी जवळपास 100 मंडळांच्या मूर्ती या मोठ्या आकाराच्या आहेत. या सर्व मूर्तींचे विसर्जन मिरजेतील गणेश तलावमध्ये करण्यात येते. शहरातील स्टँड रस्ता, गुरुवार पेठ, तांदूळ मार्केट, हायस्कूल रस्ता येथून मंडळांच्या मूर्ती विसर्जन मार्गावर मार्गस्थ होतात. या विसर्जन मार्गाची पाहणी त्यांनी केली. तसेच गणेश तलाव येथील विसर्जन स्थळाचीही त्यांनी पाहणी केली.

महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपायोजनांचा आढावा त्यांनी घेतला. गणेशोत्सव आणि ईद एकाचवेळी आल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडूनये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही मिरवणूका समोरा-समोर येवू नयेत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे, मिरज शहरचे निरीक्षक किरण रासकर, जिल्हा विशेष शाखेचे भैरू तळेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.