पोलिसांनी सोने काढून घेतले
बलात्कारातील आरोपीचे आरोप, न्यायालयाचे चौकशीचे आदेश
नागपूर : खरा पंचनामा
बलात्काराच्या आरोपीचे सोन्याचे दागिने चक्क पोलिसांनी घेतल्याचा आरोपीकडून आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने संबंधित पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाला चौकशीचे आदेश दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोप करणारा आरोपी याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तो गिटार प्रशिक्षण अकॅडमीमध्ये येणाऱ्या अल्पवयीन तरुणीसोबत बलात्कार केल्याचा आरोप आरोपीवर आहे. सागर सिंग उर्फ सॅमसन परोसिया असे या आरोचे नाव असून त्याने सोनेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कराडकर यांच्यावर सोन्याचे दागिने घेतल्याचा गंभीर आरोप लावलाय. त्यानंतर न्यायालयाने संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहे.
पोलीस कस्टडीमध्ये मारहाण न करण्याचा आमिष दाखवत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा आरोप परोसिया याने पोलिसांवर केला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीने न्यायालयातच पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस चौकशीत नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या प्रकाणामुळे पोलीस विश्वात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.