Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

९ सप्टेंबर रोजी देशाला मिळणार नवे उपराष्ट्रपती, निवडणूक कार्यक्रम जाहीर

९ सप्टेंबर रोजी देशाला मिळणार नवे उपराष्ट्रपती, निवडणूक कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली : खरा पंचनामा

जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे हे पद रिक्त झालं आहे. मात्र, आता येत्या ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक जारी केलं आहे. परिपत्रक जारी करत आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या परिपत्रकारनुसार, ७ ऑगस्ट रोजी अधिसुचना जारी केली जाणार आहे. तर २१ ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी अर्जाची छाननी होईल. तसेच २५ ऑगस्टपर्यंत ही उमेदवारी मागे घेता येणार आहे. यावेळी एका पेक्षा जास्त अर्ज वैध ठरल्यास ९ सप्टेंबरला रोजी मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या निर्वाचन मंडळाद्वारे केली जाणार आहे. याची यादीही निवडणूक आयोगाने तयार केली आहे. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने आणि आनुपातिक प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल हस्तांतरणीय मताने पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवाराला १५,००० रुपये जामीन रक्कम जमा करावी लागणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.