"मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही"
नागपूर : खरा पंचनामा
विधान भवनात ऑनलाइन रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. या प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.
कृषी खात्याच्या फेरबदलाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आले होते. धनंजय मुंडे यांनी पुन्हा कृषी खाते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात होते.
मात्र, फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की, "धनंजय मुंडे यांनी माझी तीन वेळा भेट घेतली आहे, पण ती वेगवेगळ्या कारणांसाठी होती. मंत्रिमंडळाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाच्या चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाहीत, त्या मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येच होतात." यामुळे मुंडे यांच्या कमबॅकच्या शक्यतेला तूर्तास खीळ बसली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.