Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विशाळगड दंगलीतील मुख्य संशयित रवींद्र पडवळला पुण्यातून अटक

विशाळगड दंगलीतील मुख्य संशयित रवींद्र पडवळला पुण्यातून अटक

कोल्हापूर : खरा पंचनामा

विशाळगड दंगलीमध्ये मुख्य संशयित म्हणून गुन्हा दाखल असलेला रवींद्र दिलीप पडवळ (वय ४२, रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) याला एक वर्षानंतर अटक करण्यात आली.

शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याला आज शाहूवाडी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता ३० ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

विशाळ गडावरील अतिक्रमणे हटवावीत, या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते १५ जुलै २०२५ रोजी विशाळगडच्या पायथ्याला जमले होते. जमावाला पोलिसांनी गडावर जाण्यापासून रोखून ठेवले. मात्र, काही तरुणांनी शेजारील गजापूर गावात दुकाने, वाहनांची तोडफोड करत ती पेटवून दिल्याने मोठी दंगल घडली होती. जमावाला चिथावणी देण्याचे काम केल्याप्रकरणी रवींद्र पडवळ व संभाजी साळुंखे या दोघा मुख्य संशयितांसह शेकडो जणांवर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पडवळ पसार झाल्याने पोलिस त्याच्या मागावर होते.

दरम्यान, पडवळ काही दिवसांनंतर एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. काही महिन्यांनी दुसरा मुख्य संशयित संभाजी साळुंखे यानेही अटकपूर्व जामीन मिळविल्याने त्याचीही अटक टळली होती.

शाहूवाडीचे उपअधीक्षक आप्पासो पवार, पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच शाहूवाडी पोलिसांनी पडवळला पुण्यातून अटक केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.