मिरवणुकीत नाचण्यावरून वाद, कोल्हापुरात भररस्त्यात चाकूनं तरूणावर वार
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून मित्रांमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेला. यात एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.
काल राज्यात धुमधडाक्यात गणरायाचं आगमन झालं. सार्वजनिक मंडळांपासून ते घरगुती गणपतीपर्यंत घरोघरी गणरायाचं आनंदाच्या वातावरणात आगमन झालं. मात्र, कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार घडला. गणेश आगमन मिरवणुकीत एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आलं आहे.
राजारामपुरीतल्या गणेश आगमन मिरवणुकीत हा धक्कादायक प्रकार घडला. या भीषण हल्ल्यात वाजीद जमादार जखमी झाले आहेत. वाजीद आपल्याला मित्रांना मिरवणूकीत बोलावत होता. त्यानं मित्रांना नाचण्याचा आग्रह केला. यानंतर जमादाराचे मित्र संतप्त झाले. शाब्दिक बाचाबाचीनंतर हाणामारी झाली.
संतप्त मित्रांनी जमादारावर धारदार चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात जमादार गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सापडला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या घटनेनंतर जमादारला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.