परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सातारा संघास सर्वसाधारण विजेतेपद
न्या. सुरेखा कोसमकर, महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते पारितोषिक वितरण
सातारा : खरा पंचनामा
येथे २० वा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. यामध्ये सातारा संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर पुणे ग्रामीणचा संघ उपविजेता ठरला. या मेळाव्यातील विजेत्यांना साताराच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
दिनांक ०५ ऑगस्ट ते ०८ ऑगस्ट या कालावधीत २० वा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ सातारा येथे पार पडला. शुक्रवारी या मेळाव्याचा समारोप झाला. या मेळाव्यात परिक्षेत्रातुन सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण पोलीस दलातील १३० अधिकारी व अंमलदार सहभागी झालेले होते.
स्पर्धेमध्ये सातारा संघाने १७ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्य पदके प्राप्त करुन सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद पुणे ग्रामीण पोलीस संघाने पटकावले. तसेच कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळवाव्यमध्ये प्रथम सुरु करण्यात आलेला फिरता चषक सुर्या चषक (सन २०२४ मध्ये रांची झारखंड येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या श्वानाचे स्मृती प्रित्यर्थ) हा सातारा संघाचे नार्कोटीक शोधक श्वान "सूचक" यांने पटकावले.
या स्पर्धेमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या व्यवसायीक कौशल्याची चाचणी घेणे, तपास कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडीओ ग्राफी, घातपात विरोधी तपासणी, श्वानांच्या स्पर्धा, संगणक वापर व तपास अशा विविध क्षेत्रांतील कौशल्य वाढविणेसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
यावेळी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, साताऱ्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडूकर, साताऱ्याचे पोलीस उप अधीक्षक गृह अतुल सबनीस, पोलीस उप अधीक्षक श्रीमती पद्मा कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व विजेत्यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.