अखेर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड सापडले?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत तरी कुठे, असा प्रश्न विरोधक वारंवार सरकारला विचारत होते. याचं उत्तर आता मिळालं आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 ऑगस्ट रोजी सुरु झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. त्यासाठी त्यांनी प्रकृती अस्वास्थाचे कारण दिलं होतं. राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर ते कुठेही समोर आले नाहीत किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच संजय राऊत आदींनी जगदीप धनखड आहेत कुठे, ते सध्या काय करतात, असे सवाल सरकारला विचारले होते.
विशेष म्हणजे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनखड यांना तातडीने सरकारी निवासस्थान सोडण्यास सांगितल्याचीही चर्चा होती. त्यामुळे धनखड नक्की कुठे आहेत, ते काय करत आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली नाहीत. मात्र, धनखड कुठे आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
तातडीने उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिलेले जगदीप धनखड सध्या उपराष्ट्रपतीपदासाठी दिलेल्या बंगल्यातच आहेत. ते रोज योगाभ्यास करत आहेत. तसेच कुटुंबीय आणि मित्र तसेच उपराष्ट्रपती निवासातील कर्मचाऱ्यांसोबत ते टेबल टेनिस खेळत असल्याची माहिती मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.