Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?पुणे रेव्ह पार्टी प्रकरण

रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होणार?
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण 

पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील खराडीतील एका उच्चभ्रू भागात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकनाथ खडसेंचे जावई प्राजंल खेवलकरांसह 7 जणांना ताब्यात घेण्यात आले. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. प्रांजल खेवलकर प्रकरणी रोहिणी खडसे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना पुण्यातील एका रेव्ह पार्टीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. खराडीतील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं ही रेव्ह पार्टी सुरु होती. खडसेंचे जावई खेवलकरच रेव्ह पार्टीचे आयोजक होते. रेव्ह पार्टी प्रकरणातील पुराव्यात छेडछाड केल्याचा आरोप रोहिणी खडसेंवर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी कोर्टासमोर नवी माहिती मांडली.

प्रांजल खेवलकरचे दोन मोबाईल पुणे पोलिसांनी जप्त केले. यातील एक नंबर सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावानं घेण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी कोर्टात दिलीय. सीमकार्ड हरवल्याची तक्रार सोनार यांनी देऊन पुन्हा तोच नंबर मिळवला आणि व्हॉट्सऍप डाऊनलोड करून सर्व डाटा डिलीट केला. त्यामुळे खेवलकरच्या मोबाईलमधील डाटा डिलीट झाल्याचं पोलिसांचं म्हणण आहे. मोबाईलमधील डाटा डिलीट करण्यामागे रोहिणी खडसे असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे सोनार आणि रोहिणी खडसे यांना सहआरोपी करण्याची शक्यता आहे.

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया दिली होती. 'कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं रोहिणी खडसेंनी म्हटलंय.. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर टीका केली होती. स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का असा सवाल त्यांनी केला. त्यांनी आपल्या राजकारणासाठी अनेक पीडितांचं भांडवल केलं आणि त्यातून राजकीय पोळी भाजून घेतली असा आरोप चाकणकरांनी केला. रेव्ह पार्टी प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे हेही त्यांना कळत नाही हा प्रश्नच आहे. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करत असल्याचं चाकरणकरांनी सांगितलं. तसंच रोहिणी खडसे कशाची पाठराखण करत आहेत हे अख्खा महाराष्ट्र बघत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.