Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

व्हॉट्सअप ग्रुपवर एक क्लिक करणं पोलिस अधिकाऱ्यालाच पडलं महागात...

व्हॉट्सअप ग्रुपवर एक क्लिक करणं पोलिस अधिकाऱ्यालाच पडलं महागात...

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र विधानभवनात कार्यरत असलेल्या मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर भामट्यांनी तब्बल 3 लाख रुपयांना गंडा घातला आहे. अधिकाऱ्यांच्या बँक खात्यातून भामट्यांनी ही रक्कम परस्पर लंपास केली आहे. ही घटना 18 ऑगस्टची असून याप्रकरणी ताडदेव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार व्यक्ती ही मुंबई पोलिस दलातील अधिकारी आहेत. ते एका व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य असून त्यांना 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांला 'RTO चलान' नावाची एक एपीके फाइल संबंधित ग्रुपवर मिळाली. फाइलच्या नावावरून ती महत्त्वाची असल्याचे तक्रारदार अधिकाऱ्याला वाटले. अधिकाऱ्याने त्या फाइलवर क्लिक करताच त्यांच्या मोबाइलमध्ये एक अॅप डाऊनलोड झाले आणि एक फॉर्म ओपन झाला. त्यात वैयक्तिक माहिती विचारण्यात आली होती.

अॅपद्वारे आलेल्या फॉर्ममध्ये नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक भरल्यानंतर त्यामध्ये बँक डिटेल्स मागण्यात आले. त्यावेळी तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी तात्काळ अॅप अनइन्स्टॉल केले आणि फॉर्म भरून थांबवला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. सायबर भामट्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांची बँक अकाऊंट हॅक करून त्यातून 3 लाख रुपयांची रक्कम परस्पर लांबवली.

तक्रारदार अधिकाऱ्याने अॅपद्वारे आलेल्या फॉर्ममध्ये नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक भरला होता. मात्र, बँक डिटेल्स दिले नव्हते. तरी देखील सायबर भामट्यांनी वैयक्तिक माहितीच्या आधारे बँक तपशील मिळवला आणि अधिकाऱ्यांच्या बँक खात्यावरच डल्ला मारला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने तत्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. नंतर ताडदेव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दाखल केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.