Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरकार नमले, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुदतवाढ

सरकार नमले, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुदतवाढ

मुंबई : खरा पंचनामा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दिलेली परवानगी संपली होती. मात्र, आज झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुंबई पोलिसांनी आणखी एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आंदोलन उद्याही सुरू राहणार असून, पुन्हा एकदा गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेली सुरुवातीची परवानगी गुरुवारी संपली होती. दिवसभर झालेल्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू राहणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून एक दिवसाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच काही कडक नियम आणि अटी लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी हायकोर्टाने दिलेल्या नियमावलीचं पालन केलं नाही, असा आरोप करत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. यामुळे आंदोलनाभोवतीचा वाद आणखी गडद झाला आहे.

आझाद मैदानावर दिवसभर झालेल्या गर्दीनंतर अनेक आंदोलक आता वाशीच्या दिशेने रवाना झाले आहेत. तिथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर मुंबईतील तणाव काही प्रमाणात कमी झाला असून, ईस्टर्न फ्रीवे पुन्हा मोकळा झाला आहे.

जरी काही आंदोलक निघून गेले असले तरी उद्या पुन्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी आपली मागणी पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्याही आझाद मैदानावर मराठा बांधवांची प्रचंड उपस्थिती पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.