माधुरी हत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
कोल्हापुरातल्या नांदणी इथून माधुरी हत्तीण गुजरातच्या वनतारा इथं नेल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर वनताराने कोल्हापुरात येऊन हत्तीण नांदणीला नेण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर नांदणी येथील माधुरी हत्ती बाबत पिटीशन दाखल करून घेण्यात येणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. मात्र या प्रकरणी सुनावणी लांबणीवर पडली आहे.
माधुरी हत्तीबाबत नांदणी मठाकडून दाखल केलेली याआधीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. यानंतर आता वनतारा, महाराष्ट्र सरकार आणि नांदणी मठाने एकत्रित पेटिशन दाखल केलीय. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
राज्य सरकार व वनतारा हे दोघे मिळून सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनुसार माधुरी हत्तीला सहाय्य प्रदान करणार असल्याची माहिती याआधी देण्यात आली होती. यासाठी वनतारा नांदणी येथे वनताराचे दुसरे पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याचे वनताराकडून सांगण्यात आलंय. यानंतरच राज्य सरकारच्या सहकार्याने राज्य सरकार, वनतारा व नांदणी मठ यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने माधुरी हत्तीला नांदणी येथील वनताराच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित करण्यास परवानगी दिल्यास माधुरी पुन्हा कोल्हापुरात परतू शकेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.