Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महायुतीच्या मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचा एल्गारयोगेश कदमांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यावर उधळले पैसे

महायुतीच्या मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचा एल्गार
योगेश कदमांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यावर उधळले पैसे

मुंबई : खरा पंचनामा

महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज राज्यभरात आंदोलनाचे हाक दिली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. डोंबिवलीत ठाकरे गटाने अनोखे आंदोलन करत महायुती सरकारमधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनात बनियन आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसेच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. महायुतीच्या मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आला आहे. तर अमरावती येथे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मुखवटा घालून डान्स त्यांच्यावर नकली पैसे उधळण्यात आले.

तर ठाण्यामध्ये आंदोलन स्थळी कार्यकर्त्यांनी पैशाने भरलेली बॅग आणल्याचे पाहायला मिळाले. तसेच संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानात केलेल्या मारहाणीवरून एका व्यक्तीने लुंगी आणि हातात ग्लब्स घालून संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत पत्ते देखील आणले होते.

पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनोख्या पद्धतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. कलंकित मंत्र्यांविरोधातल्या आंदोलनासाठी शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी अनोखी वेशभूषा केली होती. भरत गोगावले, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ओम फट स्वाहाच्या घोषणा देखील करण्यात आल्या.

महायुतीतील विशेषतः शिंदे गटातील वादग्रस्त मंत्र्यांविरोधात बीडमध्ये ठाकरे गटाकडून निदर्शन करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अलीकडील काळात शिंदे गटातील मंत्री वादग्रस्त ठरत असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करत तासभर रास्ता रोको करण्यात आला. शहरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अण्णाभाऊ साठे चौकात आंदोलन करण्यात आले. या भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.