उपचारासाठी दाखल करण्यात आलेली गरोदर महिला आरोपी पसार
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील जे जे रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपचारासाठी आणलेल्या एका महिला आरोपीने गर्दीचा फायदा घेत रुग्णालयातून पलायन केल्याचे समोर आले आहे. पसार झालेल्या आरोपीचे नाव रुबाना शेख असे आहे. ती फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत होती.
आरोपी रुबाना शेख हिच्यावर यापूर्वी फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तिला अटक करून भायखळा येथील महिला कारागृहात ठेवण्यात आले होते. रुबाना ही सुमारे पाच महिन्यांची गरोदर आहे. कारागृहात असताना तिला थंडी, ताप व त्वचेचे आजार जडले होते. त्यामुळे तिला अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारासाठी भायखळा कारागृहातून मुंबईतील जे जे रुग्णालयात हलविण्यात आले होते.
जे जे रुग्णालयातून उपचारासाठी आणलेल्या रूबानाने गर्दीचा फायदा घेत पोलिसांच्या देखरेखीखालून पलायन केले. ही घटना लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ परिसरात शोध सुरू केला.
या प्रकरणी जे जे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र, महिलेने अचानक पलायन केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.